जिल्ह्यातील १७ अव्वल कारकून झाले नायब तहसीलदार

0
29

गोंदिया-विभागीय आयुक्तांनी सेवाज्येष्ठता यादीला डावलून वर्षभरापूर्वी नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती दिलेल्या २0 जणांना गेल्या २६ मार्चला पदावनत करून पुन्हा जुन्याच पदावर रूजू होण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी १७ जणांची पदोन्नती करण्याचा आदेश काढण्यात आल्याने महसुल विभागील रिक्त पदे भरून काढण्याचा प्रयत्न वरिष्ठांनी केला आहे.यात 4 जणांना चंद्रपूर तर एकाला भंडारा जिल्ह्यात पाठविण्यात आले. पदोन्नत नायब तहसीलदार आणि त्यांना मिळालेले ठिकाण
■ एस.ए.घारगडे (तहसील कार्यालय, लाखनी, जि.भंडारा), एम.एस.रहांगडाले (सहा.अधीक्षक, महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया), आर.आर. मलेवार (निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया), व्ही.पी.झाडे-बावणकर (संजय गांधी योजना, गोंदिया), आर.ए.वाहने (निवडणूक विभाग, तहसील कार्यालय गोंदिया), एन.एन.बेदी (तहसील कार्यालय गोरेगाव), जी.आर.नागपुरे (निवडणूक विभाग, तहसील कार्यालय गोरेगाव) एन.एम. गावड (संजय गांधी योजना, तहसील कार्यालय अर्जुनी-मोरगाव), एन.एस.पाटील (तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव), आर.एस. पटले (उपविभागीय कार्यालय, देवरी), एस.जी.पवार (निवडणूक विभाग, तहसील कार्यालय आमगाव), डी.के. बारसे (संजय गांधी योजना, तहसील कार्यालय सालेकसा), पी.आर. अटराहे (निवडणूक विभाग, तहसील कार्यालय सडक अर्जुनी), एम.यू.गेडाम (निरीक्षण अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय गोंदिया), एस.एम. नागपुरे (निवडणूक विभाग, तहसील कार्यालय गोंडपिंपरी, जि.चंद्रपूर), डी.के. गुरनुले (तहसील कार्यालय, जिमूर जि.चंद्रपूर), एस.एन. बारसागडे (तहसील कार्यालय पोंभुर्णा, जि.चंद्रपूर), एस.जे.बांगरे (निरीक्षण अधिकारी, तहसील कार्यालय ब्रह्मपुरी)