वाशिम, दि. ०७ : राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, अधीक्षक तथा तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, नायब तहसीलदार सुनील देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.