गोंदिया,दि.07 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने जिल्ह्यातील अंतीम मतदार यादी जाहीर केली आहे. यात चारही मतदारसंघात एकूण १० लाख ९६ हजार ४४१ मतदार आहेत.सर्वाधिक ३ लाख २१ हजार २९९ मतदार हे गोंदिया विधानसभा क्षेत्रात असल्याची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी पत्रपरिषदेत दिली.यावेळी उपजिल्हा निवडणुक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.
येत्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता लागण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील चारही मतदारसंघाला पुरेल एवढ्या इव्हीएम,व्हीव्हीपीटी मशीन उपलब्ध असून काही मशीन येणार असल्याचे सांगितले.तसचे ज्या मतदारांचे नाव मतदान यादीत नाही,त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत फार्म 6 निवडणुक विभागात भरुन द्यावे असे आवाहनही डाॅ.बलकवडे यांनी केले.तसेच जिल्ह्यात 1281 मतदान केंद्र असून 1 मतदान केंद्राची मंजुरी मागण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.18 ते 19 वयोगटातील 26519 मतदार यावेळी नोंदणीकृत झालेले आहेत.तर जिल्ह्यातील 96.65 टक्के मतदारांकडे छायाचित्र असलेले ओळखपत्र उपलब्ध असून 1792 मतदार हे सर्विस मतदार आहेत.मतदारयादीचे पुनर्निरिक्षण करतांना 2902 मृत मतदारांचे असे 5386 मतदारांची नावे वगळण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ.बलकवडे यांनी दिली.तर 3376 दिव्यांग मतदार जिल्ह्यात असून यावेळी दिव्यांग मतदान केंद्रही ठेवण्यात येणार असून त्यात सर्व कर्मचारी हे दिव्यांगच राहणार असल्याचेही सांगितले.
जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत.यापैकी गोंदिया विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख २१ हजार २९९ मतदार असून यामध्ये १ लाख ५७ हजार ३८९ पुरूष आणि १ लाख ६३ हजार महिला मतदार आहेत.अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ५२ हजार ५०१ मतदार असून यामध्ये १ लाख २७ हजार ५९ पुरूष आणि १ लाख २५ हजार ४४४ महिला मतदार आहेत.तिरोडा विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ५६ हजार ६२५ मतदार असून यात १ लाख २६ हजार ९८२ पुरूष आणि १ लाख २९ हजार ६४२ महिला मतदार आहेत. आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ६६ हजार १६ मतदार असून यामध्ये १ लाख ३३ हजार १८९ पुरूष आणि १ लाख ३२ हजार ८२७ महिला मतदार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीत या चारही मतदारसंघात एकूण १० लाख ९६ हजार ४४४ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे.निवडणूक विभागातर्फे जुलै ते आॅगस्ट महिन्यादरम्यान विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. यात ७००२ नवीन मतदारांनी नोंदणी झाली. यामध्ये २६०१ पुरूष आणि ४४०१ महिला मतदारांचा समावेश आहे.मतदार नोंदणी अभियाना दरम्यान ७ हजार नवीन मतदार वाढल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.महिला मतदारांची संख्या अधिकगोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव या चारही मतदारसंघात एकूण १० लाख ९६ हजार ४४१ मतदार आहेत. यात ५ लाख ४४ हजार ६१९ पुरूष आणि ५ लाख ५१ हजार ८२० महिला मतदार आहेत. पुरूष मतदारांच्या संख्येच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे.पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने व्हीव्हीपॅटबाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे.