सडक अर्जुनी,दि.08 : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून १0 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली शिव स्वराज्य यात्रेचा सडक अर्जुनी येथे आगमन होणार आहे. याप्रसंगी आयोजित स्वागत कार्यक्रमानंतर भव्य जाहीर सभेला खासदार प्रफुल पटेल, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विपक्ष नेते धनंजय मुंडे, खा. डॉ. अमोल कोल्हे, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी व इतर मान्यवर या यात्रेच्या आगमनावेळी सभेला संबोधित करणार आहेत.
परिसरातील नागरिकांनी, पक्षाचे कार्यकर्त्यांनी यावेळी मोठय़ा संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले. कोहमारा येथे आयोजित बैठकीला उपस्थित सर्वांना संबोधित करताना ते बोलत होते. या बैठकीत प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे गट नेते गंगाधर परशुरामकर, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, रमेश चुर्हे, अविनाश काशीवार, लोकपाल गहाने, मिलन राऊत, रजनी गिर्हेपुंजे, छाया चव्हाण, नरेश भेंडारकर, दिनेश कोरे, गजानन परशुरामकर, मंजू डोंगरवार, अनिरूद्ध बाबोडे, जगन लंजे, भैयालाल पुस्तोडे, कृष्णा दलाल, अलाऊद्दीन राजानी, आनंद अग्रवाल, एफ.आर.टी. शहा, वंदना थोटे, पुष्पमाला बडोले, सुखदेव कोरे, बेनिराम कापगते, रमेश इळपातेसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्तावित अविनाश काशीवार यांनी केले. संचालन दिनेश कोरे यांनी तर आभार रजनी गिर्हेपुंजे यांनी मानले. या शिवस्वराज यात्रेचा सडक अर्जुनी नंतर दुपारी ३ वाजता तिरोडा येथे आगमन होणार असून भव्य स्वागत व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
|