कोका वन्यजीव अभयारण्यातून जाणाऱ्या तीन रस्त्यावरील ज़डवाहतूकीस साय.6 ते सकाळी 6 बंदी

0
15

भंडारा,दि. 17 :-   भंडारा-करडी व्हाया पलाडी रस्ता, भंडारा-करडी व्हाया सालेहेटी रस्ता तसेच तुमसर-साकोली रस्ता हे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत कोका वन्यजीव अभयारण्यातून जातात. या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवास व जिवितास धोका निर्माण झाला आहे. वन्यप्राण्यांना एका वनक्षेत्रातून दुसऱ्या वनक्षेत्रात रस्तयावरुन सतत होणाऱ्या वाहतुकीमुळे ये-जा करणे अशक्य झाले आहे. रात्रीचे वेळी अनेक वन्यप्राणी रस्त्यावरील वाहनांमुळे मृत पावले आहेत. वन्यप्राणी व जैवविविधितेचे जतन करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे   भंडारा-करडी व्हाया पलाडी रस्ता, भंडारा-करडी व्हाया सालेहेटी रस्ता तसेच तुमसर-साकोली रस्ताच्या  वाहतुकीस    सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले आहेत.

सदर रस्त्यावर रुग्णवाहिका. अग्निशमन वाहने यांना सूट देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे शेतमाल, वनोपज वाहतूक करण्याकरीता वनपरिक्षेत्र अधिकारी कोका यांची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद आहे.भंडारा-करडी व्हाया पलाडी रस्ता व भंडारा-करडी व्हाया सालेहेटी रस्ता बंदीच्या वेळी पर्यायी रस्ता भंडारा-करडी व्हाया ढिवरवाडा असा असेल, या क्षेत्रातील स्थानिक गावांच्यालोकांना येण्याजाण्यास सूट राहील. तसेच तुमसर-साकोली रस्त्यावरील  सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत  बंदी  ही जड वाहतुकीकरीता आहे, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आदेशात नमुद आहे.