पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडतीबाबत

0
51

गडचिरोली,दि.17:- महाराष्ट्र जिल्हा परिषदा( अध्यक्ष,उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उप सभापती ) (पदांचे आरक्षण व निवडणूक ) नियम,1962 मधील तरतुदीनुसार गडचिरोली जिल्हयाच्या अधिकारी क्षेत्रातील एकुण 12 पंचायत समित्यांकरीता त्यांना सध्या: स्थितीत लागु असलेल्या आरक्षाच्या समाप्तीनंतर लगेच येणाऱ्या दिवसापासुन अडीच्‍ वर्षाच्या कालावधी करीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ( विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिला ( अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग, यामधील महिलांसह ) यांच्यासाठी राखुन ठेवावयाच्या, सभापती पदांच्या जागा निश्र्चित करुन दिलेल्या आहेत.       त्यास अनुसरुन महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 (1962 चा महाराष्ट्र क्रमांक

5) च्या कलम 67 मधील तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ( विमुक्त जाती व भटक्ता जमातीसह) आणि महिला (अनुसूचित जाती,जाती,अनुसूचित जमाती , नागरिकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग यामधील महिलांसह) यांच्यासाठी राखुन ठेवावयाच्या, गडचिरोली जिल्हयातील एकुण 12 पंचायत समित्यामधील सभापती पदांच्या जागा निश्र्चित करावयाच्या आहेत. त्याकरीता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरीता कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा , एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा, या 12 पंचायत समितीचे नावे असे आहे.  जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील जिल्हा नियोजन समितीचे जुने सभागृह येथे दिनांक 19 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 1.00 वाजता विशेष सभा आयोजित केली आहे. तरी उपरोक्त सभेला ज्या नागरिकांची हजर राहण्याचीर इच्छा आहे त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे प्राधिकृत अधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.