गोंदिया,दि.१८ : संत शिरोमणी गुरु घासीदासबाबा सतनामी समाज मानव सेवा समिती गोंदियाच्या वतीने प.पु. संत शिवरोमणी गुरु घासीदासबाबा यांची २६३ वी जयंती बुधवार, १८ डिसेंबरला यादव चौक येथे साजरी करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक बारामतार हे राहणार तर प्रमुख अतिथी म्हणून पंकज यादव, लोकेश यादव, समितीचे उपाध्यक्ष राजू जोगी, कोषाध्यक्ष तुलसीराम जोगेश्वर, सचिव मानसिंग कुर्रे, रामकुमार कोसरे आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली दुपारी २ वाजता पंकज यादव यांच्या घरासमोरून सुरू होणार असून बाराखोली चौक, शहर पोलीस स्टेशन, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, बुचया चौक भ्रमण करीत यादव चौकात रॅली संपन्न होणार आहे. सायंकाळी झंडा वंदन करून महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. तसेच ३१ डिसेंबरला यादव चौक येथे रात्री छत्तीसगडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती समारोहाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बहुरदास बजारे, राजकुमार चंदनिया, महावीर जोगी, विष्णु टंडन, शंकर टंडन, शालीकराम बारामतार, मुकेश हरपाल आदींनी केले आहे.