तुमकडीकसा येथे नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन

0
17

चिचगड,दि.18: जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाèया तुमडीकसा येथे नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आरोग्य तपासणी करुन घेतली. पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनात चिचगडचे पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांच्या नेतृत्वात दुरक्षेत्र गणुटोला येथील पोलीस कर्मचाèयांनी व नागरिकांनी या आरोग्य शिबिरासाठी सहकार्य केले. यावेळी उपसरपंच जमुनाताई मडावी, बिसराम मडावी, अर्जुन सयाम, चमरु टेंभुर्णे, किर्तीराम टेंभुर्णे उपस्थित होते.
आरोग्य तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय ककोडीचे वैद्यकीय अधिकारी जितेश वालदे व त्यांची चमू तसेच ग्रामीण रुग्णालय चिचगडचे वैद्यकीय अधिकारी हेमंतकुमार व त्यांची चमू तसेच सी.ए.साखरे, विजय मडावी, डोमेश मोगरे, डी.झेड, सोनागर, डॉ. दिनेश कटरे, कृषी अधिकारी श्रेी.कोळी, प्रपोगंडा सेलचे पोलीस कर्मचारी रेखलाल गौतम, मोहन भोयर उपस्थित होते. या शिबिरात २५० च्या वर महिला-पुरुष, मुले यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वितेसाठी बिट अमलदार, पोलीस हवालदार, राजन मासरकर, उदेभान रुखमोडे यांनी सहकार्य केले.