गोंदिया,दि.29ः- महाराष्ट्र राज्य अंगणवाड़ी बालवाडी कर्मचारी यूनियन आयटक गोंदिया जिल्हा कार्यकारिणीची सभा आज 29 डिसेबंरला कामगार भवन येथे जिल्हाध्यक्ष शकुंतला फटिंग यांचा अध्यक्षतेखाली पार पडली.सभेत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाड़ी कर्मचारी यूनियनचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहागंडाले यानी मार्गदर्शन केले.15 डिसेंबरला आयटकच्या राज्य बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली तसेच येत्या 8 जानेवारी 2020 रोजी जिल्हा कामगार कर्मचारी अंगनवाड़ी,आशा वर्कर,पोषण आहार, ग्राम पंचायत, शेतमजूर, शेतकरी तसेच विद्युत विभाग कर्मचारी, ठेका कामगार, कंत्राटी नर्सेस यांच्या मागण्यांना घेऊन असंघठित क्षेत्रातील कंत्राटी कामगार कर्मचार्यांना 21000 रुपये वेतन व 10000 रुपये पेंशन लागू करण्यात यावे. आरोग्य,शिक्षण,रोजगार, वाढती महागाई व खाजगीकरणाच्या विरोधात देशव्यापी संप आयोजित करण्यात आले असून या संपाला यशस्वी करण्याचे आवाहन हौसलाल रहांगडाले यानी केले. यावेळी राज्य सचिव जीवनकला वैद्य,विना गौतम,रेखा बिसेन,सुनीता मलगाम,ज्योती लिल्हारे,पुष्पकला भगत,लालेश्वरी शरणागत,दुर्गा संतापे, राजलक्ष्मी हरिणखेडे आदी उपस्थित होते.