ओबीसी जनगणनेसाठी विधानसभाध्यक्ष पटोलेंना निवेदन

0
22

देसाईगंज(वडसा)दि.29ः- देशात बहुसंख्येने असलेल्या ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावे यासाठी देशव्यापी आंदोलन सुरु असून त्याकळीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या देसाईगंड(वडसा) या शाखेने विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन सादर करुन ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली.यावेळी राष्ट्रीय ओबीसी संघ देसाईगंजचे अध्यक्ष महेश झरकर,विलास ढोरे,अरुण राजगिरे,हेमंत दुनेदार,जयंत दहिकर व ओबिसी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.निवेदनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.मंडल आयोग,नच्चिपन समिती आणि स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात यावे.शेतकरी शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करण्यात यावे.ओबीसीचे आरक्षण १९ टक्के पुर्ववत करण्यात यावे.ओबीसींना शासन पदभरती मध्ये वयोमर्यादा ३८ वर्ष वरुन ४५ करण्यात यावे.ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे.सारथी या शासनाचा योजनेचे कार्यालय नागपूरला देण्यात यावे.ओबीसींसाठी विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावे.महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे नावे वडसा येथे मोठे वाचनालय सुरु करण्यात यावे.ओबीसी प्रवर्गांला अ‍ॅट्रॉसिटीमध्ये सहभागी करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.