उत्कृष्ट कार्याबद्दल विजय ठोकणे यांचा सक्षम द्वारा सत्कार

0
21

गोंदिया,दि.30ःःगेल्या पंधरा वर्षापासून समग्र शिक्षा विभागात जिल्ह्यातील दिव्यांग मुलांकरिता राबविब्यात येणाऱ्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व विविध नाविन्यपूर्ण उपक्रम दिव्यांग मुलांकरिता राबवून त्यांना जगण्याचा आशेचा किरण जिल्हा समन्वयक विजय ठोकणे अविरत देत असल्याने त्यांचा काल “सक्षम” या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
दिनांक 29 डिसेंम्बर रोजी सक्षमच्या जिल्हा कार्यालयाचे उदघाटन व दिव्यांगांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते तर समाजसेवक डॉ सुधीर जोशी, समाजसेविका श्रीमती ढोक, सक्षम चे विदर्भ प्रांत अध्यक्ष इंगोले, जिल्हा अध्यक्ष प्रभाकर राव, सचिव डॉ. विद्यासागर मोहन, शहर संघचालक बोपचे, समाजसेविका श्रीमती मंजुताई कटरे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
“सक्षम” ही दिव्यांगांच्या उत्थानासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था असून गेल्या 5 वर्षांपासून जिल्ह्यात आपले कार्य करीत आहे. नुकताच सक्षम द्वारा जिल्ह्यातील दिव्यांगांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या वेळी त्यांची दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या चा सत्कार केला.यावेळी विजय ठोकणे यांनी सत्कार स्वीकारल्यावर शासनाद्वारा दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित दिव्यांग बांधवांना दिली. या सत्काराचे खरे मानकरी जिल्हा परिषदेचे वरीष्ठ अधिकारी व जिल्ह्यातील संपूर्ण चमू असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.