गडचिरोली,दि.13ः-जिल्हा माळी समाज संघटनेच्यावतीने १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती गोकुळनगर येथील कांता लोनबले यांच्या घरी स्वरा मोहुर्ले हिच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करुन साजरी करण्यात आली.यावेळी जिल्हा माळी समाज संघटनेच्या सुधा चौधरी, कांता लोनबले, ज्योती जेंगटे, मीना जेंगटे, वंदना मोहुर्ले, मनिषा निकोडे, निरुता कोटरंगे, संध्या सोनुले, सारिका लोनबले, पुरण पेटकुले, रमेश जेंगटे, शंकर चौधरी, अशोक शेंडे, मोहुर्ले, फुलचंद गुरनुले, यशवंत निकोडे, सुखदेव जेंगटे, प्रभाकर कोटरंगे, हरिदास कोटरंगे, नरेंद्र निकोडे, अशोक मांदाडे, रेवती कावळे, यशवंत कोकोडे, रेवतीनाथ कावळे, गजानन सोनुले, राजेंद्र आदे, देवराव मोहुर्ले यांसह महिला व पुरुष उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस लेखाधिकारी सतिश धोत्रे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तर युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी रोखपाल वाय. पी. सोरते, विवेक दुधबळे, निमिष गेडाम, वासुदेव कोल्हटकर, रमेश मगरे, सोरते, जे. एच. चांभारे, चहांदे, व्ही. एम. मोलगुरवार, वी. डी. उनगाटी, जिल्हा माहीती कार्यालयातील महादेव बसेना व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.