रात्रंदिवस जेसीबीने मुरुमाचे उत्खनन

0
49

सडक अर्जुनी,दि.14 : तालुक्यातील सौंदड येथील राष्ट्रीय महामार्गावरील तलावाच्या बाजुने जेसीबीच्या माध्यमातून 10 ते 15 ट्रॅक्टर लावून अवैध मुरूम उत्खनन करत आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असून महसूल विभाग करते तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी एका मुरूम वाहनावर कार्यवाही करण्यात आली होती. मात्र, त्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. कुंपनच शेत खात असेल तर सौंदड गावातून होत असलेल्या अवैध मुरूमाच्या वाहतुकीवर आळा घालणार कोण? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सौंदड येथील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. काही गावातील नागरिकांचा नुकताच फोन आला होता. त्याची पाहणी व कारवाईसाठी सदर कर्मचारी घटनास्थळी पोहोचतील. अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांमध्ये सौंदड येथील काही वाहनधारक असल्याची माहिती मिळाली आहे.
उषा चौधरी, तहसीलदार, सडक अर्जुनी