एचआयव्हीच्या थर्ड लाईन औषधांचा तुटवडा;एचआयव्हीग्रस्त रुग्णांचा जीव धोक्यात

0
21

गोंदिया,दि.14 : एचआयव्ही हा आजार जीवघेणा आहे. या आजाराच्या थर्ड लाईन औषधांचा सध्या तुटवडा सुरू आहे. थर्ड लाईन औषधांसाठी एआरटीचे केवळ सहा केंद्र असून याठिकाणी रुग्णांना सात ते आठ गोळ्याच दिल्या जात आहेत. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने (नॅको) एचआयव्हीचे औषध जिल्हा स्तरावरच खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र औषध खरेदी ई-टेंडरिंगची प्रक्रीया रखडली आहे. त्यामुळे गत दीड महिन्यांपासून सर्वत्र एचआयव्हीच्या थर्ड लाईन औषधांचा तुटवडा आहे. एचआयव्ही रुग्णांसाठी राज्यभरात अ‍ॅरन्टी रिट्रोव्हायरल थेरपी(एआरटी) केंद्र सेवा देत आहेत. याठिकाणी एचआयव्हीच्या रुग्णांना गरजेनुसार फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लाईन औषधे दिली जातात. विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी अकोल्यातील एआरटी केद्र एकमेव केंद्र आहे. येथे विदर्भातील सर्वच थर्ड लाईन औषधोपचार केला जात आहे. परंतु, गत वर्षभरापासून एचआयव्हीच्या या औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना दोन महिन्याऐवजी केवळ दहा ते पंधरा दिवस पुरेल एवढीच औषधे दिली जात आहेत. त्यामुळे शासन एचआयव्हीग्रस्तांप्रती किती संवेदनशील आहे, याचा प्रत्यय येतो. यामुळे एचआयव्ही ग्रस्तांचा जीव धोक्यात आला आहे.