आपल्या अधिकार प्राप्तीसाठी एकजूट व्हा- डॉ. बबनराव तायवाडे

0
186

नागपूर,दि.25ः- जिल्ह्यातील महादुला कोराडी येथे ओबीसी महिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ओबीसी समाजाने स्वतःची ओळख निर्माण करावी शैक्षणिक विकासाशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही समाजाच्या प्रगतीला राजाश्रयाची गरजही तेवढीच महत्त्वाची असल्याचे विचार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनरावजी तायवाडे यांनी व्यक्त केले.तसेच एक महिला ही पूर्ण घर सुशिक्षित करू शकते, म्हणून महिला जागृती करून ओबीसी समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवण्यासाठी ओबीसी महिला मेळाव्याचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हणाले.

उदघाटन माजी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे, जिल्हा परिषद सदस्य सौ. अवंतिका लेकुरवाळे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ अध्यक्ष सुषमा भड, प्रदेशाध्यक्ष कल्पना मानकर, नंदा देशमुख, विद्यार्थी संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष निलेश कोढे, कामठी तालुकाध्यक्ष नलिनी धुळस, नगरसेवक स्वप्नील धोटे, नगरसेवक महेश धुळस, गुणवंत पटले, पंचायत समिती सदस्य सविता जिचकार, संजय पन्नासे, विनोद हजारे, सोमनाथ सनोडिया, हर्ष वानखेडे उपस्थित होते.पुढे बोलतांना तायवाडे म्हणाले की, प्रत्येक घरापर्यंत ओबीसीचे संविधानिक हक्क पोहोचवण्यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओबीसी समाजाचे जातीय जनगणना होणे, ओबोसी विद्यार्थ्यांना 100 % शिष्यवृत्ती द्यावी , ओबीसी समाजाला लावलेले नॉन-क्रिमिलेयरची अट रद्द करावी, अश्या विविध समस्या ओबीसी समाजासमोर आहे हे त्यांनी सांगितले.

माजी आमदार बावनकुळे यांनी समाज संगठीत करून त्यांना सुशिक्षित बनवणे आवश्यक असून ओबीसीच्या न्यायहक्कासाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले.ओबीसी समाजाने आपल्या समाजाची प्रगती करून देशाच्या विकासाच महत्त्वाची भूमिका बजवावी.ओबीसीवर होणाऱ्या अन्यायाप्रती लढा देण्यासाठी व  त्यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी पाठीशी आहोत असे  प्रतिपादन केले.यावेळी  प्रिती मोहोनकर, सुरेखा काकडे, सुनिता कान्हारकर, अर्चना दिवाने,मनीषा इगले, कविता खोब्रागडे, लक्ष्मी भांडारकर आदी महिला कोराडी व महादुला शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रास्तविक ओबीसी महिला महासंघाचे तालुकाध्यक्ष नलिनी धुळस यांनी, संचालन शोभा चौधरी तर आभार रेणुका धुळस यांनी मानले.