गोंदिया दि. 27 : : राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015. या कायदयान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबध्द सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायदयाची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या कायदयांतर्गत कोणत्या सेवा नागरिकांना प्राप्त करुन घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ही माहिती आपण आर.टी.एस.महाराष्ट्र या मोबाईल ॲपवर किंवा आपले सरकार वेब पोर्टलवर पाहू शकता व सेवा प्राप्त करण्याकरीता ऑनलाईन अर्ज सुध्दा करु शकता. वेब पोर्टलद्वारे म्हणजेच https://aaplesarkar.mahaonline.gov.in किंवा RTS Maharashtra ही मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरमधून फ्री डाउनलोड करता येईल. सदर मोबाईल ॲप ॲन्ड्रॉईड मोबाईल किंवा आयओएस मोबाईलमध्ये आपल्याला वापरता मोबाईल अप्लीकेशन आरटीएस महाराष्ट्र किंवा आपले सरकार वेब पोर्टलमध्ये प्रवेश करुन या कायदयांतर्गत कोणती सेवा उपलब्ध आहे याची माहिती नागरिकांना मिळेल. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिक देखील ऑनलाईन अर्ज करु शकतात. पुरेशी औचित्य न देता सेवा प्रदान करण्यात किंवा नकार देण्यास विलंब झाल्यास, नागरिक आपल्या खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रथम अपील आणि दुसरे अपील दाखल करु शकतात.