गोंदिया दि. 27 :-: : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया मार्फत तसेच तालुका विधी सेवा समिती आमगाव, देवरी, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव व तिरोडा अंतर्गत मार्च 2020 या संपूर्ण महिन्यात जिल्ह्यातील दुर्गम भागातील विविध गावामध्ये फिरते कायदेविषयक साक्षरता शिबिरे व लोकअदालतीचा शुभारंभ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत 2 मार्च 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा न्यायालय गोंदिया येथून करण्यात येणार आहे.
संपूर्ण मार्च महिन्यात ठरलेल्या ठिकाणी विविध विषयांवर कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रम व नंतर लोकअदालतीमध्ये संबंधीत न्यायालयातील प्रलंबीत दिवाणी व फौजदारी तडजोड योग्य प्रकरणे तसेच पुर्व न्यायप्रविष्ट प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात येणार आहे. याकरीता संबंधीत न्यायालयांचे न्यायाधीश तसेच एक वकील व एक सामाजिक कार्यकर्ता हे पक्षकारांना त्यांची प्रकरणे तडजोड करण्यास मदत करणार आहेत.
ज्या पक्षकारांना त्यांची तडजोडपात्र प्रलंबीत किंवा दाखलपूर्व प्रकरणे या फिरते लोकअदालतीमध्ये तडजोड करावयाची आहेत त्यांनी संबंधीत न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया तसेच संबंधीत तालुका न्यायालयातील तालुका विधी सेवा समितीकडे 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील जनतेनी या फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीरे व लोकअदालत योजनेअंतर्गत सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे यांनी केले आहे.
नियोजित कायदेविषयक साक्षरता कार्यक्रम/लोकअदालतीचे दिनांक व ठिकाण पुढीलप्रमाणे आहेत. 2 मार्चला ग्रामपंचायत कार्यालय कटंगी (ता.गोंदिया), 3 मार्च ग्रामपंचायत कार्यालय कारंजा (ता.गोंदिया), 4 मार्च ग्रामपंचायत कार्यालय हिरडामाली (ता.गोरेगाव), 5 मार्च ग्रामपंचायत कार्यालय रावणवाडी (ता.गोरेगाव), 6 मार्च ग्रामपंचायत कार्यालय गंगाझरी (ता.गोंदिया), 7 मार्च ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव/खांबी (ता.अर्जुनी/मोर), 9 मार्च ग्रामपंचायत कार्यालय कान्होली/कोहलगाव (ता.अर्जुनी/मोर), 11 मार्च ग्रामपंचायत कार्यालय परसटोला (ता.अर्जुनी/मोर), 12 मार्च ग्रामपंचायत कार्यालय कोसमतोंडी (ता.सडक/अर्जुनी), 13 मार्च ग्रामपंचायत कार्यालय राका (ता.सडक/अर्जुनी), 16 मार्च ग्रामपंचायत कार्यालय जांभळी (ता.सडक/अर्जुनी), 17 मार्च ग्रामपंचायत कार्यालय कोयलारी (ता.देवरी), 18 मार्च ग्रामपंचायत कार्यालय झाशीनगर (ता.देवरी), 19 मार्च ग्रामपंचायत कार्यालय आदर्शनगर (ता.देवरी), 20 मार्च ग्रामपंचायत कार्यालय खुर्शीपार (ता.आमगाव), 21 मार्च ग्रामपंचायत कार्यालय तिगाव (ता.आमगाव), 23 मार्च ग्रामपंचायत कार्यालय सालेकसा, 24 मार्च ग्रामपंचायत कार्यालय कावराबांध (ता.आमगाव), 26 मार्च ग्रामपंचायत कार्यालय वडेगाव (ता.तिरोडा), 27 मार्च ग्रामपंचायत कार्यालय मुंडीकोटा (ता.तिरोडा), 30 मार्च ग्रामपंचायत कार्यालय करटी (ता.तिरोडा) व 31 मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय दवनीवाडा (ता.तिरोडा) येथे आयोजित करण्यात आले आहे.