गोंदिया,दि.28 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा गोंदियाच्या वतीने प्रशासकीय इमारत जयस्तंभ चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास निदर्शने केली.सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, चतुर्थ कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील सुधारित भत्ते लागू करावे, केंद्राप्रमाणे महागाई भत्त्याची रक्कम तत्काळ मंजूर करावी, वेतनातील त्रूटी दूर कराव्या, भाववाढीवर उपाययोजना करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, सर्व विभागातील रिक्तपदे तत्काळ भरा आदी प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.यावेळी संघटनेचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे लिलाधर पाथोडे,मदन चुर्हे,विरेंद्र कटरे,आशिष रामटेके,पी.जी.शहारे,शैलेष बैस,विनोद चौधरी,कमलेश बिसेन,कार्तिक चव्हाण,अजय खरवडे,आलोक देसाई,एल.आर.ठाकरे,रामा जमईवार,गुणवंत ठाकूर,लिलाधर तिबुडे,यामिनी पारधी,एम.टी.मलेवार,सुलभा खाडे,अनु नान्हे,मिनाक्षी बिसेन,के.व्ही.नागफासे,एस.डी.डोंगरे आदी कर्मचारी पदाधिकारी सहभागी झाले होते.