गोंदिया,दि.28ःजिल्ह्यात २४ फेब्रुवारीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांसह मालमत्तेचे सुध्दा नुकसान झाले. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे एकूण १६०९ घरे आणि गोठ्यांची पडझड होऊन ८३ लाख ४२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला असून शासनाकडून आपदग्रस्तांना किती नुकसान भरपाई दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.सोमवारी (दि.२४) गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सर्वाधिक कौलारुंच्या घराचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडाल्याने व घरे आणि गोठ्यांवर झाडांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याचा सर्वाधिक फटका सालेकसा, सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव तालुक्याला बसला आहे. आमगाव तालुक्यात ४१ घरे आणि गोठ्यांची, सालेकसा तालुक्यात १४८० घरे आणि गोठे,सडक अर्जुनी तालुक्यात ६२ घर आणि गोठे व गोंदिया तालुक्यात १३ आणि तिरोडा तालुक्यात ४ घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. यामुळे ८३ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले.सदर नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्या यंत्रणेतंर्गत करण्यात आले.
अवकाळी पावसामुळे ९७४ हेक्टरमधील पिके बाधितअवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना व भाजीपाल्याला बसला. जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविलेल्या अहवालात ९७४ हेक्टरमधील पिके बाधीत झाले आहे. यात २७२ हेक्टरचे ३३ टक्केच्या आत तर ७०२ हेक्टरचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. या नुकसानीत अजुन वाढ होण्याची शक्यता महसूल विभागाने वर्तविली आहे.जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे असून त्या पाठोपाठ गहू आणि हरभरा या पिकांचे आहे. बºयाच शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत रब्बी पिकांचा विमा उतरविला होता. त्यामुळे ३३ टक्केच्यावर ७०२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून पीक विमा कंपन्या आता शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी नेमका कोणता निकष लावतात. याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.
अशात २४ फेब्रुवारी रोजी वादळी वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे, जवळपास दहा मिनिटे बोराच्या आकाराच्या गारा बसरल्या. शेतपीकाचे मोठे नुकसान झाले. यात आंबा व केशोरी मिरचीला याचा मोठा फटका बसला आहे. तर पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने अनेक तास वीजपुरवठा खंडीत होता. याचा सामना इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना करावा लागला.
या वादळी पावसामुळे जिल्ह्यात १ हजार ६0९ घर व गोठ्यांची पडझड झाली आहे. यात सर्वाधिक नुकसान सालेकसा तालुक्यात झाले असून येथे १ हजार ४८0 घर अंशत: पडली असून १ घर पूर्णपणे पडले आहे. प्रशासनाने या नुकसानीची अंदाजीत रक्कम ७४ लाख रुपये सांगितली आहे. देवरी तालुक्यात ८ घर व गोठे अंशत: पडले असून ५४ हजार ५00 रुपये अंदाजीत नुकसान, आमगाव तालुक्यात ४१ घर व गोठे अंशत: पडली असून २ लाख ६ हजार रुपये अंदाजीत नुकसान, गोंदिया तालुक्यात १३ घर व गोठे अंशत: पडले असून ३ लाख ८२ हजार रुपये अंदाजीत नुकसान, सडक अजुर्नी तालुक्यात ६२ घरांचे कवेलु फुटली असून ३ लाख ८२ हजार रुपये अंदाजीत नुकसान व तिरोडा तालुक्यात ४ गोठे व घराचे छत कोसळून १ लाख ५ हजार रुपयांचे अंदाजीत नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, गोरेगाव व अजुर्नी मोर तालुक्यात वादळी पाऊस झाला असला तरी येथे घर व गोठ्यांची पडझड झाली नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी उपरोक्त आकडेवारी ही प्राथमिक स्वरुपाची असल्याचे सांगून अंतिम आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.