वनकामगारांचा 4 मार्चला मोर्चा,धरणे व आमरण उपोषण

0
117

गोंदिया,दि..29ः-वनकामगारांच्या समस्येला घेवून वारंवार संबंधीत अधिकाèयांना निवेदन देवून सुद्धा न्यायोचित मागणीकडे वनअधिकारी वर्ग लक्ष देत नाही. आणि बारमाही वनकामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने वनकामगारांच्या या मागणीला धरून येत्या बुधवारी (दि. ४) मार्च रोजी गोंदिया येथील तहसील कार्यालय सहाय्यक कामगार आयु्क्त न्यायालयासमोर पासून एफ.डी.सी.एम कार्यालयावर धडक मोर्चा, धरणे आंदोलन व आमरण उपोषणाचे आयोजन एफ.डी.सी.एम.चे विभागीय वनकामगार अध्यक्ष छन्नु नेवारगडे, आणि सचिव यशवंत बोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.

या मोर्चा, धरणे व आमरण उपोषणात वनकामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दरवर्षी २४० दिवस व चौदा-पंधरा वर्षे काम केलेल्या बारमाही वनकामगारांना कामावर घ्यावे, मर्जीतील ६० वर्ष पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त कामगारांना कामावरून बंद करून त्या जागेवर अनुभवी व बारमाही बंद केलेल्या कामगारांनाच घ्यावे, तिन महिन्याच्या नावाखाली बोगस हंगामी कामगारांचे नावे टाकू नये व त्या जागेवर कामावर बंद असलेले अनुभवी कामगारांनाच घ्यावे, उन्हाचे दिवस सुरू झाले असून फायर वॉच म्हणून बारमाही कामावर बंद असलेले कामगारांनाच घ्यावे, मृतक बारमाही नियमीत वनकामगार (चौकीदार/ वनसंरक्षक) यांच्या मृत्यूनंतर उपासमारीचे जीवन जगणाèया त्यांच्या वारसांना योग्यतेनुसार जंगलात qकवा कार्यालयातील कामगार म्हणून ठेवावे,

हंगामी वनमजूरांचे यात बिडींग करणारे, पालवी, झाडे, फाटे, qटबर कापणारे त्यांचे नावे सीपीएफ कापण्यात आले असून २०१२ पासून त्यांचे सीपीएफ चे पैसे ऑनलाईन सेवा सुरू करून सुद्धा त्यांच्या नावात, आडणावात जन्मता चुका असल्यामुळे त्याचे पैसे ऑनलाईन निघत नसून त्यासाठी विभागीय स्तरावर स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी अशाप्रकारे अनेक मांगण्यांचा समावेश असून या मागण्यांना घेवून येत्या बुधवारी (दि. ४) मार्च रोजी वनकामगारांचे गोंदिया येथे धडक मोर्चा,धरणे आंदोलन व आमरण उपोषणाचे आयोजन एफडीसीएमचे विभागीय कामगार अध्यक्ष छन्नु नेवारगडे व सचिव यशवंत बोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.

तरी या नियोजित सर्व कार्यक्रमात गोंदिया जिल्हयातील एफडीसीएमचे सर्व वनकामगारांनी आवर्जून उपस्थित राहून आपल्या एकतेच्या श्नतीचे प्रदर्शन दाखवावे असे आवाहन वनकामगार विभागीय सदस्य विनायक साखरे, भाऊलाल ठाकरे, मनोहर जांभूळकर, शंकर सातार, पद्म घाटघुंबर, धर्मपाल बांबोळे, गालीब शेख, नेवालाल रहांगडाले, भास्कर येल्ले, सेवक नागपुरे व पुरन सेंदरे आदींनी केले आहे.