नवेगावबांध.दिं.29.ःआत्म्याच्या निगराणीखाली सर्व कर्मेंद्रिय काम करतात. संतांनी, प्रबोधनकारांनी आपल्या उपदेशातून आत्म्याच्या विकासाला प्राधान्य दिले. आत्मा विकसित होणे ही काळाची गरज आहे. साधुसंतांनी तेच केले. असे प्रतिपादन डॉक्टर अ.का.कापगते यांनी केले.
ते अटल अभिनव सहकारी संस्था नवेगावबांध तथा संपूर्ण ग्रामस्थ पुरुष व महिला भजनी मंडळ यांच्या सौजन्याने 22 फेब्रुवारी रोज शनिवारला सायंकाळी 7.30 वाजे पासून खास महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर भजन स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या भव्य खंजीरी भजन स्पर्धेचे उद्घाटन येथील सुप्रसिद्ध चिकित्सक डॉ.अ.का. कापगते यांच्या शुभहस्ते सायंकाळी 7.30 वाजता दीपप्रज्वलनाने उद्घाटन संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव बोरकर हे होते. तर अतिथी म्हणून सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार ,माजी जिल्हा परिषद सदस्य विशाखा साखरे, विजयाताई कापगते,प्राचार्य आर. टी. काशिवार, एस. एम. नरुले ,रामदास बोरकर, जगदीश पवार, ऋषी पुस्तोडे, मूलचंद गुप्ता, तलाठी कुमरे, डॉक्टर देवाजी कापगते ,अशोक हांडेकर, खुशाल काशीवार, टि.जी.संग्रामे, धनुजी डोंगरवार,ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई सांगोलकर,शीतल राऊत,आगाशे, गुनिता डोंगरवार, हर्षा बाळबुद्धे अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र कापगते यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार बाळू कापगते यांनी मानले कार्यक्रमाला नवेगाव बांध ग्रामवासी महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.