रासेयो स्वयंसेवकांनी बांधला 27 फूटाचा वनराई बंधारा

0
69
देवरी,दि.02ः-तालुक्यातील सुरतोली/लोहारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरतोली/लोहाराच्यावतीने मोहनटोला येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्या सात दिवसीय विशेष निवासी शिबिरातंर्गत  मोहनटोला येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.शेतकर्‍यांना सिंचनाची सोय व्हावी या उद्देशाने रासेयो स्वयंसेवक व स्थानिकांच्या श्रमदानातून 900 सिमेंट बोऱ्यांचामाध्यमातून 27 फूट वनराई बंधारा तयार करण्यात आला.यात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.किशोेर मेंढे,सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.मनोज हेमने,जि.प.सदस्य दिपक पवार,सरपंच राकेश चांदेवार,उपसरपंच गोविंद गौतम,पोलीस पाटील रविंद्र क्षीरसागर,माजी सरपंच संजय मानकर,रासेयो स्वयसेंवक शैलेश नेताम,आशिष, शैलेश देसाई, आकाश, मोहित, संगम, अजय, नितीन, राजेश, सुरेश, मासूम, सुभाष, शिवकुमार, रोहित, नीलम, जान्हवी, पायल, नैना, उज्ज्वला, शुभांगी, किरण, खेमेश्वरी, भाग्यश्री, सीमा, सविता, नाशिका, मोनिका, दिव्या, मोसमी, आशा, निरुताई, दिपाली, श्रुती, गीताताई नंदेश्वर व माजी विद्यार्थी आस्तिक परिहार तसेच गणेश परिहार, देवेंद्र परिहार,शिवसिंह परिहार,नवल पवार इ. ग्रामस्थ उपस्थित होते.