गोंदिया दि.13(जिमाका) :राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात गोंदिया जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात किंवा इतर जिल्हा राज्यात जायचे असल्यास केवळ तातडीची वैद्यकीय गरज, कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा मजूर, भाविक, विद्यार्थी, प्रवाशी व इतर नागरिक जिल्ह्यात अडकले असल्यास केवळ ई-पासच्या माध्यमातून परवानगी देण्यात येणार आहे.
ज्यांना ई-पासच्या माध्यमातून परवानगी पाहिजे असल्यास त्यांनी http://covid19.mahapolice.in या संकेतस्थळावर माहिती भरणे आवश्यक आहे.तातडीची वैद्यकीय गरज असल्यास ई-पास मिळण्यासाठी फोटो,ओळखपत्र वर दिलेल्या लिंकवर अपलोड करणे आवश्यक राहिल. गोंदिया येथे नमूद आजारावर उपचार होत नसल्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया किंवा अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया यांचे प्रमाणपत्र, प्रवास करणाऱ्या सर्व व्यक्तींचे वैद्यकीय प्रमाणपत्र यामध्ये वाहन चालकाचे सुद्धा प्रमाणपत्र,वाहन क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास फोटो, ओळखपत्र,डॉक्टरांचे प्रमाणपत्र (मृत्यूबाबत)/ स्थानिक प्राधिकरणाचा मृत्यू दाखला,प्रवास करणाऱ्या सर्व व्यक्तींचे व वाहन चालकाचे वैद्यकीय प्रमाणपत्र,वाहन क्रमांक व मोबाईल क्रमांक वर दिलेल्या लिंकमध्ये अपलोड करणे आवश्यक राहील.
जे नागरिक गोंदिया जिल्ह्यामध्ये अडकले आहे त्यांचा फोटो,ओळखपत्,र कायम रहिवास असल्याबाबतचा पुरावा, प्रवास करणाऱ्या सर्व व्यक्ती व वाहन चालकाचे वैद्यकीय प्रमाणपत्र,वाहन क्रमांक व मोबाईल क्रमांक यावर दिलेल्या संकेत स्थळामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
इतर राज्यांमध्ये जायचे असल्यास त्या राज्याच्या जिल्ह्यातील जिल्हा दंडाधिकारी यांचे कडून गोंदिया जिल्हा कार्यालयात प्रवासासाठी संमती मिळाल्यानंतर ई-पास निर्गमित करण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून किंवा इतर राज्यातून कुठल्याही व्यक्तीला आणायचे आणायला जायचे असल्यास त्या व्यक्तीचा ई-पास संबंधित जिल्ह्यातून मिळाल्यानंतरच गोंदिया जिल्ह्यातून ई-पास देण्यात येईल.
वरील सर्व कागदपत्रे एकाच डिजिटल फाइलमध्ये स्कॅन करुन अपलोड करावी.सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर नियमानुसार ई-पास मोबाईलवरच प्राप्त होईल.हेल्पलाईन क्रमांक 07182-230196, व्हाट्सआप व मोबाईल क्रमांक 9404991599 यावर संपर्क साधावा.
जे नागरिक गोंदिया जिल्ह्यात अडकले आहे परंतु त्यांना राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जायचे आहे, त्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा संबंधित तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा. जाऊ इच्छिणाऱ्या सर्व प्रवाशांची माहिती ई-मेलवर उपलब्ध करून द्यावी.गोंदिया उपविभागीय अधिकारी गोंदिया – [email protected], उपविभागीय अधिकारी तिरोडा [email protected], उपविभागीय अधिकारी देवरी – [email protected],उपविभागीय अधिकारी अर्जुनी/मोरगाव [email protected], तहसीलदार गोंदिया- [email protected],तहसीलदार तिरोडा[email protected], तहसीलदार आमगाव[email protected], तहसीलदार सालेकसा[email protected],तहसीलदार देवरी[email protected], तहसीलदार सडक /अर्जुनी [email protected], तहसीलदार गोरेगाव[email protected] आणि तहसीलदार अर्जुनी/मोरगाव[email protected] यावर उपलब्ध करून द्यावी.
वैद्यकीय तपासणी करून देण्याची सुविधा पुढील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, काचेवाणी ता.तिरोडा डॉ. रेश्मा चव्हाण
(8806 948848), प्राथमिक आरोग्य केंद्र,इंदोरा/खुर्द ता. तिरोडा डॉ. पराग फटिंग(7499331771) प्राथमिक आरोग्य केंद्र रिसामा,ता.आमगाव डॉ. मृदुला तिवारी
(7218823645), प्राथमिक आरोग्य केंद्र,पिंडकेपार ,ता. गोरेगाव डॉ.पायल गजभिये
( 96 65840205), प्राथमिक आरोग्य केंद्र, माहूरकुडा ता.अर्जुनी/ मोरगाव डॉ.स्वाती पाटणकर (98501170 69),प्राथमिक आरोग्य केंद्र, डव्वा ता. सडक/ अर्जुनी,डॉ.रोहित हरीणखेडे (9764098339), प्राथमिक आरोग्य केंद्र, डूग्गीपार ता.सडक/ अर्जुनी डॉ.मयुरी घरडे (7972193320), प्राथमिक आरोग्य केंद्र, भरेगाव ता.देवरी डॉ. धनश्री बिसेन
(77670777548), प्राथमिक आरोग्य केंद्र परसवाडा,ता.तिरोडा डॉ. सुदीप्त आदित्य (8888589812), प्राथमिक आरोग्य केंद्र,नवेगावबांध ता.अर्जुनी/मोरगाव डॉ.युगा नाकाडे (9860975197),प्राथमिक आरोग्य केंद्र,कवलेवाडा/इंदोरी ता.तिरोडा,डॉ.हर्षदीपा पटले (7620696825),प्राथमिक आरोग्य केंद्र,खाडीपार,ता.सडक/अर्जुनी डॉ.प्रीतमलाल डहाके(8275485982), प्राथमिक आरोग्य केंद्र,मुंगली,ता. अर्जुनी/मोरगाव डॉ.गौरव टेम्भेकर (8007097542),प्राथमिक आरोग्य केंद्र,तिगाव.ता.आमगाव डॉ.प्रीती चौहान(7721026783) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र,कालीमाटी ता. आमगाव डॉ.उमेन्द्र तिरेले(8668838703) यांचेशी संपर्क साधावा.