गोंदिया रेस्टॉरंट असोसिएशनची कार्यकारिणी गठीत

0
326

गोंदिया,दि.18ः गोंदिया अंर्तगत येणार्‍या समस्त रेस्टॉरंट, फास्ट फूड संचालकांची आवश्यक सभा नुकतीच घेण्यात आली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून गोंदिया रेस्टॉरंट असोसिएशनची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून अखिलेश सेठ यांची तर उपाध्यक्षपदी रवी चौरसिया यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे कार्यकारिणीच्या इतर पदाधिकारी व सदस्यांमध्ये अंकित पटेल, सचिव राजेश अग्रवाल, सहसचिव नरेन्द्र पाठक, कोषाध्यक्ष लक्की भाटिया, तांत्रिक सल्लागार मो.जलील सोलंकी यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सल्लागार समितीत राजेश चावड.ा, गिरीश शिवहरे, मनिष अग्रवाल, राजन शिवहरे, चेतनदास माखीजा, संजय लारोकर, हरदीप गुलाटी व कार्यकारिणी सदस्य म्हणून रमित भाटिया,रब्बू जैन, तरंग जैसवाल, घनश्याम दरबार, राहुल वंजारी आदिंचा समावेश करून जबाबदारी देण्यात आली. सभेचे संचालन राजन शिवहरे, लक्की भाटिया यांनी तर आभार प्रदर्शन राजेश अग्रवाल यांनी केले.